सिनगाव जहांगीर येथे 10 ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आर. व्ही. मेडीकेअर हार्ट अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जालना यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिर मोफत रक्तदाब, शुगर व ईसीजी तपासणी शिबिर 10 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता बेला हॉस्पिटल, सिनगाव जहांगीर येथे आयोजित केले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अँजिओप्लास्टी मोफत.. करून मिळणार आहे
या शिबिरात जालना येथील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ रामेश्वर सानप,डॉ विष्णू भुते स्वतः उपस्थित राहून तपासणी करणार आहेत,सर्व गावकरी मंडळींनी घ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे,अधिक माहितीसाठी डॉ. शुभम गजानन डोईफोडे बेला हॉस्पिटल सिनगाव जहागीर यांचेशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.