नांरडा येथे महसूल सप्ताह अंतर्गत रस्त्याचा दुतर्फा वृक्षलागवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहा अंतर्गत ३ ऑगस्ट रोजी “पाणंद,शिवरस्ते मोजणी करून अतिक्रमणमुक्त करणे व त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड” हा विषय घेऊन विशेष कार्यक्रम नारंडा येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमा प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह , तहसीलदार श्रीमती पल्लवी आखारे, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गतया कोरपना तालुक्यातील प्रत्येक मंडळातील गावा-गावांमध्ये अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्यावर दुतर्फा झाडे लावण्याच्या उपक्रम राबविण्यात आला. तसेच अतिक्रमण असलेले पांदण रस्ता त्यांच्यावरील अतिक्रमणे ओळखून अतिक्रमणमुक्तीची कारवाई करण्यात आली
झाडांची देखभाल व संरक्षणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शेजारील शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला.
लागवडीनंतर झाडांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, जेणेकरून दीर्घकालीन संवर्धन शक्य होईल.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास व पर्यावरण संवर्धन एकत्र साधले गेले.
तसेच गावातील मंजूर झालेल्या संजय गांधी निराधार योजनेचा मंजूरी आदेश आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते नागरिकांना वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर गावातील नागरीक उपस्थित होते.