श्रीकांत राठोड यांना वसंत यौद्धा पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ज्ञानप्रकाश लोकसंस्थे द्वारा दिला जाणारा वसंत यौद्धा पुरस्कार या वर्षी नागपूर येथील धडाडीचे कार्यकेर्ते कुशल संघटक, धाडसी नेतृत्व लाभलेले नागपूर येथील श्रीकांत विष्णू राठोड यांना जाहीर झाला आहे. अनेक वर्षापासून ते सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी कार्यरत आहेत.विधायक मार्गाने रस्त्यावरच्या लढाई पासून न्यायालयीन लढयासाठी सदैव तत्पर असतात. छोट्या मोठ्या उपलब्धीचे अनेक यशोगाथा त्यांनी निर्माण केले आहे. नागपूर जिल्हयातील खैरी पन्नासे गाव पूर्णपणे उद्घवस्त झाले होते.
पोलीस विभागातील जबाबदारी सांभाळून त्यांनी रात्रंदिवस एक करून परिणामाची पर्वो न करता खैरी पन्नासे गाव वसविले,खडतर संघर्षातूर त्यांनी खैरी पन्नासेच्या लोकांच्या हक्कासाठी यशस्वी लढा लढून त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी निवाऱ्याचा प्रश्न तडीस लावला. शासकीय सेवेत कार्य करत मिळणाऱ्या वेळेत कार्य करुन सर्वासमोर प्रेरणादायी आदर्श इतिहास रचला आहे.ज्ञानप्रकाश लोकसंस्थेनी त्यांच्या कार्याची दखल घेत वसंत यौद्धा पुरस्कार जाहीर केला आहे. ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी एका शानदार कार्यक्रमात परस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या सोबतच विविध क्षेत्रात कार्यरत तीन लोकांचेही कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे. ज्यात रुग्नसेवेसाठी समर्पित मा.कुंदन शेरे, जैविक शेती व शेतकरी विकास अभियानाचे निमंत्रक मा. रामराव चव्हाण, पुसद व मा. अजयभाऊ संगीडवार,मूल या प्रयोगशिल, उद्यमशिल शेतकऱ्याचा समावेश राहणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. इंजि.प्रवीण पवार, आय आय टी गुरुकुल नागपूर, मा. इंजि.आत्माराम चव्हाण,कारभारी,नागपूर नगरी, अॅड. बद्रीप्रसाद चव्हाण, कारभारी, नागपूर नगरी राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक मा. कॅप्टन एल.बी. कलंत्री,मा. संचालक रेशीम, महाराष्ट्र शासन, पारशिवनीचे क्रियाशिल संवर्ग विकास अधिकारी मा.सुभाष जाधव राहणार आहेत. याप्रसंगी मा. ज्ञानेश्वर रक्षक,अभ्यासक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. उत्कर्ष सभागृह, विदर्भ हिंदी साहित्य संघ, झासी रानी चौक,नागपूर येथे ९ ऑगस्ट २०२५ दु. १.०० हा कार्यक्रम सुरु होणार असल्याचे श्रीपतभाऊ राठोड सांगितले.