ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयटक अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष पदी सुनिता तिडके (काळे) तर सचिव पदी रेणुका डोईफोडे यांची बिनविरोध निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय आयटक संघटनेच्या देऊळगाव राजा तालुका अध्यक्षपदी सुनीता तिडके (काळे) यांची रविवारी झालेल्या बैठकीमध्ये एक मताने निवड करण्यात आली. अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक ही संघटना गेल्या कित्येक वर्षापासून राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर सदर संघटना काम करीत आहे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली देऊळगाव राजा येथे रविवारी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या या बैठकीमध्ये अध्यक्ष पदी सौ सुनीता तिडके (काळे ), आणि सचिव पदी रेणुका डोईफोडे यांची निवड करण्यात आली,कार्यकारणी मध्ये सरस्वती सानप, सारिका काळे, मंदा चेके यांची एकमताने निवड करण्यात आली तिडके यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन निर्गमित नसताना अनेक जाचक कामे सांगितल्या जातात तसेच शासनाकडून एकात्मिक बाल विकास विविध योजनांचे जीआर काढले जातात त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत नाही सोबतच आरोग्य खाते, निवडणूक विभाग. आणि इतर विभागांचे जे सदर कार्यालय अंतर्गत कामे येत नसताना करून घेतल्या जातात याआदी प्रश्नांवर प्रामुख्याने आवाज उठवणार असल्याचे तिडके यांनी सांगितले या बैठकीला आयटक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर गायकवाड, शशिकला मौर्यमहाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, सुरेखा तळेकर जिल्हा सचिव, तुळसाबाई बोपले जिल्हा उपाध्यक्ष, संगीता ठाकूर जिल्हा कोषाध्यक्ष. यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी यांची उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये