ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथील पूर्वप्राथमिक विभागात वाचन संस्कृतीची गरज आणि महत्त्व या उपक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि टि.व्ही. चे आकर्षण जरी जास्त असले तरी पुस्तकाचे महत्त्व अजुनही अबाधित आहे. मुलांना लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे हाच हेतू लक्षात घेता चांदा पब्लिक स्कूल येथिल पूर्वप्राथमिक विभागात शनिवार दिनांक 14/02/2026 ला रिड टू रिवायर या वाचन कौशल्यास प्रोत्साहित करणा-या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरवात प्रमुख अतिथी चंद्रपूर येथील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ. नसरिन मावानी, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता जिवतोडे, मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व ज्ञानेश्वरी पुजनाने करण्यात आली.

दररोज वाचन केल्याने मनुष्याच्या विचारशक्तीला व कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळून व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास कसा होतो. आपण वाचनाची सवय कशी लावून घ्यावी याविषयी वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांनी लघु नाटिका सादर करून वाचनाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले.

इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांकरिता वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकविणा-या वर्ग 1 ली ची इनया खान व वर्ग 2 री ची जिजाऊ माने यांनी सर्वांसमोर पुस्तकाचे प्रभावी वाचन करून उपस्थितांची मने जिंकली. तर वाचन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथिंच्या हस्ते गौरवचिन्ह देवून गौरविण्यात आले.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता जिवतोडे यांनी मुलांना लहानपणासूनच वाचणाची सवय कशी लावावी, वाचनातून आपल्याला नवे विचार, नवी स्वप्ने आणि नवी प्रेरणा कशी मिळते हे सांगत असतांना आपण आपले संस्कार आणि संस्कृती पुढच्या पिढीला द्यायची असते. आणि मूलं आपल्याच कडून संस्कार घेत असतात. नेहमी मुलांसोबत पुस्तकं वाचा म्हणजे मुलं आपले बघून वाचन करतील. असे वक्तव्य केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचनाकरिता शुभेच्छा देवून वाचनाचे महत्त्व सांगत वाचनामुळे आपल्या कल्पनाशक्तीला पंख फुटतात व आपण एका जागी बसूनही जगभर फिरू शकतो. म्हणून लहानणासूनच वाचनाची सवय लावून घ्या असे वक्तव्य केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. नसरिन मावानी यांनी मूल जन्माला येतं तेव्हापासूनच जर आपण त्याच्या पुढे वाचन केले तर मुलांचा मेंदू त्याप्रमाणेच सक्षम व्हायला सुरवात होते. मुलांच्या उद्दिष्टांपर्यंत जर आपल्याला त्यांना पोहचवायचे असेल तर त्याच्या प्रगतीचा मार्ग तुम्हाला आत्ताच ठरवावा लागेल असे वक्तव्य केले.

‘स्कॉलेस्टिक‘ या प्रकाशनाने विद्यार्थ्यांसाठी विविधरंगी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा मिश्रा यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम पूर्वप्राथमिक विभागप्रमुख शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा याकरिता कार्यक्रम प्रभारी संगिता वेखंडे यांनी तर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मकचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये