राज्यस्तरीय सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गडचांदूरच्या महात्मा गांधी विद्यालय येथील शिक्षिका दिपाली पाचभाई राज्यात प्रथम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कर्मचारी सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेत नागपूर विभागातून पाच शिक्षक राज्यस्तरावर सहभागी झाले होते. त्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील विज्ञान शिक्षिका. दीपाली घनश्याम पाचभाई यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दीपाली पाचभाई या जून २०२६ मध्ये शिक्षण सेविका म्हणून रुजू झाल्या असून अल्पावधीतच त्यांनी हे मानाचे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, सचिव धनंजय गोरे, संचालक प्रा. डॉ. अनिल चिताडे तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी कोरपना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी. कल्याण जोगदंड, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूरचे प्राचार्य साईनाथ मेश्राम, माजी प्राचार्य गिरिधरराव बोबडे,. हरिश्चंद्र थिपे, नामदेव ठेंगणे सर तसेच विद्यालयातील शिक्षक परिवार व पंचायत समिती कोरपना यांच्या वतीनेही दीपाली पाचभाई यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व शिक्षक मित्रपरिवाराकडून दीपाली पाचभाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



