राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, सावली येथे विद्यार्थी विकास विभाग गोंडवाना विद्यापीठ च्या सहकार्याने व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आयोजीत करण्यात आली.या कार्यशाळेचे उद्घाटन सोहळा १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून डॉ.प्रिया गेडाम संचालक,विद्यार्थी विकास विभाग गोंडवाना विद्यापिठ,तर अध्यक्षस्थानी डॉ. ऐ चंद्रमौली तसेच विधार्थी विकास समन्वयक डॉ. प्रफुल्ल वैराळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ.प्रिया गेडाम, संचालक विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठ यांच्या हस्ते झाली. यावेळी डॉ. गेडाम यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेत दिशा दाखवताना सांगितले की, “व्यक्तिमत्व विकास हे फक्त बाह्य सौंदर्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. हे मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या समन्वयातून साधता येते.” त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक शक्तीला चालना मिळवण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले गेले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात डॉ. चंद्रमौली यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या महत्त्वाची आठवण करून दिली आणि सांगितले की, “व्यक्तिमत्व विकास केवळ बाह्य स्वरूपाच्या बदलासाठी नाही, तर एकात्मिक दृष्टिकोनातून आपले जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी बनवण्यासाठी महत्त्वाचा आहे.” ते पुढे म्हणाले की, “हे कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांना चालना देईल.”
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे सहसमन्वयक डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले. यावेळी प्रा. सचिन वाकडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर प्रा. ओमकार चन्नावार यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. रागीनी पाटील, प्रा. मुकेश निखाडे, डॉ. संदिप देशमुख,डॉ.संगानंद बागडे, डॉ. प्रेरणा मोडक,डॉ. राजश्री मार्कंडेवार आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेत महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.



