बोरगाव खुर्द ता. कोरपना येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे युवा शक्ती क्रीडा मंडळ व एकता गणेश मंडळ बोरगाव खुर्द यांचे सौजन्याने कबड्डी स्पर्धेचे खुले सामने आयोजित केले आहेत, या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 16/2/2026 सोमवारला रात्री 8.30 वाजता संपन्न झाले.
या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उदघाट्न श्री. विजयरावजी बावणे साहेब, संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी यांचे हस्ते पार पडले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोदजी कोडापे तालुका कोषाध्यक्ष भाजपा,तथा जिल्हा महामंत्री भाजपा जमाती मोर्चा चंद्रपूर हे होते. तर विशेष अतिथी म्हणून श्री.उत्तमरावजी पेचे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी, भाऊजी पा.चव्हाण माजी संचालक बाजार कोरपना, गणेशजी गोडे संचालक बाजार समिती, विलास पा. आडे माजी सरपंच रूपापेठ, लिगांजी वेट्टी, श्री. मालेकर, अनिल गोंडे,प्रेमीला किन्नाके सरपंच, रेणुकाताई आडे उपसरपंच, श्रीराम आत्राम तं. स. अध्यक्ष,सत्यवानजी आत्राम माजी सरपंच,पो. पाटील आत्राम,ग्रा.पं.स. रामेश्वर वेलादी, आदेश शेडमाके,माजी उपसरपंच किशोरजी गौरकर,दिनेश सूर,करंडे सर,शंकर पा आत्राम, गजानन पा. आमने, गजानन पा. सोयाम,उद्धवजी राजूरकर,सुभाष गौरकर,बंडू कुमरे, अवी सोयाम, राजू आत्राम,आदी मान्यवर उपस्थित होते.
या कबड्डी स्पर्धेचे आयोजन युवा शक्ती क्रीडा मंडळ व एकता गणेश मंडळ, आशिष राजूरकर,आकाश राजूरकर,चेतन आमने, रोहन गेडाम, प्रवीण शेडमाके, विक्रम शेडमाके, प्रज्वल हेकाड, साहिल आत्राम, अजय शेडमाके, सोनल मडावी, विक्रम गेडाम, कृपाल बल्की,रोशन शेडमाके,आदीनी कार्यक्रम यशस्वीतेकरिता सहकार्य केले.



