देऊळगावराजा सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अनियमितता थांबवा
जय शिवसंग्राम संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रियेत शेतकरी व नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
या संदर्भात जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने दुय्यम निबंधक कार्यालयास निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात खाजगी व अनधिकृत कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप, असल्याने तसेच दस्त नोंदणीसाठी घेतले जाणारे अनधिकृत शुल्क या वर तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे. जय शिवसंग्राम संघटनेने अशा प्रकारच्या अनियमितता थांबवण्यासाठी काही ठळक मागण्या मांडल्या आहेत. अतिरिक शुल्क आकारू नये. शासकीय दरपत्रक आपल्या कार्यालयात लावावे.
अनाधिकृत व्यक्तींना कार्यालयातील कामात सहभागी होऊ देऊ नये. नागरिकांना शुल्क बाबत स्पष्ट माहिती द्यावी. खरेदी दस्त नियम बाह्य असल्यास लेखी कारण द्यावे. नागरिकांना सन्मानाने सेवा द्यावी. 15 दिवसांत कारवाई करून लेखी उत्तराची मागणी केली आहे ,योग्य ती कारवाई न झाल्यास जय शिवसंग्राम संघटनेचे वतीने दुय्यम निबंधक कार्यालयात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल यात कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष जहीर खान, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, शेख इम्रान, असलम खान, साजिद खान, राजेश भाग्यवंत, राजू गव्हाणे, अनिस शहा, किशोर वाघ, शेख अहमद आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत