जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, वर्धा यांची कुख्यात गुंड व अवैध दारु विक्रेते यांचे विरुध्द बेधडक मोहीम
पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथील कुख्यात गुंड व अवैध हातभट्टी दारु विक्रेत्यास एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत मध्यवर्ती कारागृह, अकोला येथे रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतील महात्मा फुले वाई, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड व दारुविक्रेता नामे गणेश अरुण मेश्राम, वय ४२ वर्ष, रा. महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट चे अभिलेखावर शरीराविरुध्द, हत्यार कायदा तसेच दारुबंदी ऑनियम अंतर्गत सन २०१९ पासून एकूण ०९ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये पातक शस्थासह बाळगणे, दुखापत करणे, जवर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, दारु बाळगुण तिची विक्री करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो सतत गुन्हे करण्याच्या सवईचा गुन्हेगार होता. त्या पैकी ०१ गुन्हा पोलीस तपासावर असुन २८ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. मागील १० वर्षापासुन स्थानबध्द इंसम नामे गणेश अरुण मेश्राम हा महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट नि. वर्धा परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. गणेश अरुण मेश्राम राह. महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि वर्धा पाच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याचेविरुध्द कलम ५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये तडीपार कार्यवाही, कलम ११० (ई) (ग) फौजदारी कायदा तसेच कलम १२९ (ई) भारतीय नागरी सुरक्षा संहोता अंतर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आल्या होत्या.
परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने ठाणेदार हिंगणघाट यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विधातक कृत्यांना आळा घालण्याचावत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्धये स्थानबध्द करण्याबायतया प्रस्ताव मा. वान्मथी सी.. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांना मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने सादर केला होता. सदरहू स्थानबध्द गुंड प्रवृत्तीचा आणि रखतत्याने करीत असलेल्या गुन्ह्यांची मा. बान्पथी सी. जिल्हादंडाधिकारी यांनी गांभीवाने दखल घेवून गणेश अरुण मेश्राम, वय ४२ वर्ष, रा. महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा याचे विरुध्द दिनांक ११६.०२.२०२५ रोजी स्थानवध्द आदेश जारी केल्याने त्यास मध्यवती कारागृह, अकोला येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. मागील १ वर्षातील कालावधीमध्ये पोलीस विभाग व महसुल विभाग यांचेमधील योग्य समंन्वयामुळे एम.पी.डी.ए. कायद्यान्यचे धडक कार्यवाही करण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुया विक्री करण्याकरीता पुरवठा करणान्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर, तसेच रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये धडकी भरलेली असुन गुन्हेगारी विश्वात पुढचा नंबर कुणाचा लागेल या भितीने चांगलीच दहशत निर्माण झालेली असुन गुन्हेगारांमध्ये चर्चा रंगत असल्याचे दिसुन येते.
आगामी घेणारे सण उत्सव व निवडणुक शांतता पूर्ण वातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर, तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मयी सी., तसंच मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार आग्रवाल, यांनी दिलेले आहेत.
सन २०२५ साली एकुण १८ दारु विक्रते, गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत जैल मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२६ वर्षाची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत ही तिसरी कार्यवाही आहे. अवैध दारू विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती व रेती माफीयांवर कठोर कार्यवाही करण्याचे संकेत मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेले आहे. मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे वेधडक मोहीमेमुळे अवैध दारू विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती तसेच रेती माफीया मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिव बाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा श्री. मुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पोनी/विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली पोहवा/अमोल आत्राम, पोहवा आशिष महेशगीरी, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि./अनिल राऊत, पोहवा/प्रविण देशमुख, पोशि/विजय हारनूर, संग्राम मुंडे पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी केली आहे.



