ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शॉर्टसर्किटमुळे घराच्या स्वयंपाक खोलीत लागली आग 

संसार उपयोगी साहित्य जळून खाक ; कोरपना येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :_ येथील एका घरातील स्वयंपाक खोलीत शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना मंगळवार दिनांक १७ रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास लागली.या आगीत घरातील अनेक संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली.

शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये तुळशीराम लक्ष्मण मडावी यांचे घर आहे. त्यांच्या घरी फ्रिजला लावून असलेल्या प्लग मध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे अचानकरित्या फ्रीजला लागून असलेल्या वायर ने पेट घेतला घेतला. यातच बाजूला लागून असलेल्या गादी, अन्नधान्याचे कट्टे व घरातील अन्य साहित्याला आग लागली. या घटने दरम्यान घरात कोणीच नव्हते. तेव्हा मडावी यांची मुलगी काही कामानिमित्त घरात आल्या असता. त्यांना आगीच्या धुरीचे लोट दिसून आले. त्यांनी लागलीच तत्काळ आजूबाजूच्या शेजाऱ्यांना कल्पना दिली. त्यांच्या मदतीने विद्युत पुरवठा बंद करून पाण्याच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले.

याच स्वयंपाक खोलीत सिलेंडर सुद्धा होता. दुर्दैवाने पुन्हाही आग भडकली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये