मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर मध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्त्रीरोगतज्ञ यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, स्त्री रोग तज्ञ मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेच्या प्राचार्या माननीय असमा खान मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूरचे सचिव मा. इब्राहिम जव्हेरी सर तसेच मा. श्री संजय गादेवार सर,अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट त्याचबरोबर मा. डॉ. स्नेहल पोटदुखे डर्माटोलॉजिस्ट, अध्यक्ष आयएमए वुमन्स विंग, चंद्रपूर डॉ. कल्याणी दीक्षित गायनॅकॉलॉजिस्ट चंद्रपूर त्याचबरोबर बल्लारपूर सेवा समितीचे सदस्य श्री सादिक जव्हेरी सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलित करून विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत गीत व स्वागत नृत्य करून स्वागत करण्यात आले.त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता दहावी च्या विद्यार्थिनी हिमांशी पवार,पूजा जयचंद्र निषाद व बारावी विज्ञान च्या विद्यार्थिनी मौरवी सदाला 78%,ईशा अनिल कुमार मिश्रा 75.50% व बारावी कॉमर्स च्या विद्यार्थिनी निशा लवलेश वर्मा 61.50%, संजना नितीन दास 55.83%, बारावी आर्ट च्या विद्यार्थिनी लजिना आसिफ खान 73.15%, राणी फुलचंद वर्मा 70.83% या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्याचबरोबर आपली मुलींची शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्या, त्वचा विषयक समस्या याकरिता प्रोजेक्टरच्या माध्यमातून डॉ. कल्याणी दीक्षित मॅडम तसेच डॉ.स्नेहल पोटदुखे मॅडम यांनी विद्यार्थिनींना स्त्रीरोग याविषयी मार्गदर्शन केले. याचबरोबर मा.संजय गादेवार सर, इब्राहिम सर त्याचबरोबर सादिक सर यांनी सुद्धा आपल्या शालेय जीवनातील अनुभवातून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन सीमा धाडवे मॅडम तसेच आभार प्रदर्शन सरिता उमरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी मोलाचे सहकार्य केले .