ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची स्थापना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे दिनांक 2 ऑगस्ट रोजी सत्र 2025-2026 च्या शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम,उप मुख्याध्यापक विजय डाहुले, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षिका सौ माधुरी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली,निवडणूक अधिकारी सहा. शिक्षक प्रशांत धाबेकर, हरिहर खरवडे, संतोष मुंगुले, अमोल शेळके तसेच सर्व वर्ग शिक्षक यांच्या मदतीने निवडणूक घेण्यात आली.

लोकशाही पध्दतीने मोबाईल द्वारे गुगल फॉर्म च्या मदतीने निवडणुकीत इयता 6 ते 10 वीच्या 1620 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान केले. निकालात मुख्यमंत्री पदी कु. जिया पठाण, उपमुख्यमंत्री पदी कु.समीक्षा येवले, शिक्षण मंत्री सोहम सोयाम, आरोग्य मंत्री कु. रोजी शेख, सांस्कृतिक मंत्री कु. संस्कृती भुते, क्रीडामंत्री पियुष गुरनुले,पर्यावरण मंत्री साहिल पिंपळकर,शालेय पोषण आहार मंत्री सुमित गायकांबळे, स्वच्छता मंत्री ईशांत साठवणे यांची बहुमताने निवळ झाली. शालेय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना पुष्पगुच्छ व हार घालून मुख्याध्यापकांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये