देऊळगाव राजा येथे नवीन ठाणेदार ब्रह्म गिरी रुजु
तालुका पत्रकार संघने केला सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे पोलिस निरीक्षक पदी ब्रह्म गिरी 1 ऑगस्ट रोजी रुजू झाले आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांचे स्थानांतर झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही यांच्या कडे पदभार होता.
ब्रह्म गिरी येथे रुजू होण्यापूर्वी ते अमरावती येथे पोलिस निरीक्षक पदी कार्यरत होते, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे, देऊळगाव राजा येथे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे पत्रकारांशी वार्तालाप करतांना सांगितले, देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ चे अध्यक्ष गजानन तिडके यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांचा शाल व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम व पत्रकार उपस्थित होते.