बंधन राखीचे प्रेम पर्यावरणाचे
लखमापूर शाळेतून पर्यावरणाचा दिला संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे 2 ऑगस्ट रोजी कार्यानुभव उपक्रम अंतर्गत एक नावीन्यपूर्ण व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. उच्च श्रेणी मुख्याध्यापक विनोद क्षीरसागर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ राख्या तयार करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.
विद्यार्थ्यांनी जुन्या कापडाचे तुकडे, रिबन्स, बटनं, आणि इतर पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यांचा वापर करून सुंदर राख्या तयार केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरणप्रेम, व स्वयंपूर्णतेची जाणीव निर्माण झाली.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने टाकाऊपासून टिकाऊ राखी तयार करण्याचा संदेश देत शाळेने समाजात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद दिला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून शाळेतील शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता वास्तव जीवनाशी जोडले गेले आहे, हे सिद्ध झाले.
सदरच्या उपक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर सोबतच आरोग्य सेविका होत्या.