स्व.ॲड.मोरेश्वर टेमुर्डे यांच्या जयंतीनिमित्त भद्रावती येथे स्मृतीगंध कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
माजी विधानसभा ऊपाध्यक्ष तथा विवेकानंद ज्ञानपीठ, वरोराचे माजी अध्यक्ष स्व. ॲड.मोरेश्वर टेंमुर्डे यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त दिनांक ४ रोज सोमवारला शहरातील श्री मंगल कार्यालय येथे स्मृतीगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांच्या चरीत्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार असुन मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यात तज्ज्ञ डाक्टरांच्या हस्ते हृदयरोग, मधुमेह, बालरोग, मेंदुरोग,नेत्ररोग, अस्थीरोग आदिंसह विवीध रोगांच्या तपासण्या करण्यात येणार आहे. याशिवाय विवेकानंद महाविद्यालयाच्या विवेक या वार्षीकांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. विवेकानंद ज्ञानपीठ या शैक्षणिक संस्थेअंतर्गत असलेल्या विविध शाळा,महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, मायाबाई मोरेश्वरराव टेंमुर्डे, पालकमंत्री डॉ. अशोक ऊईके, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किर्तीकुमार भांगडिया,आ.सुधाकर अडबाले, आमदार करण देवतळे, आ.संजय देरकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, रूरल चेंबर्स ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष डॉ रमेश राजुरकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक जिवतोडे यांची ऊपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा तथा मोफत आरोग्य शिबीराचा लाभ शहर तथा परीसरातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक विवेकानंद ज्ञानपीठ च्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.