प्रेरणा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात दिनांक २ ऑगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन व प्रशिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन युगचेतना बहुद्देशीय ग्रामविकास संस्थेचे उपाधक्ष्य अरविंद मुसने यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोविंद मेंदे (ग्रामीण टपाल विभाग जिवती ) आणि प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अरविंद मुसने, तर प्रमुख अतिथी म्हणून गोविंद मेंदे, प्राचार्य नानेश्वर धोटे, प्रा. दुर्गावती कुबाळकर, प्रा, अंजना पवार, प्रा प्रवीण आंबटकर यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेत एम पी एस सी, यू पी एस सी, तलाठी, पोलीस भरती, एस एस सी, बँकिंग अशा विविध स्पर्धा परीक्षांची माहिती, अभ्यासक्रम, अभ्यासपद्धती, वेळापत्रक नियोजन यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पूर्व परीक्षांचे प्रश्नसंच, ऑनलाइन परीक्षा पद्धती याबाबतही विद्यार्थ्यांचे शंका निरसन करण्यात आले. गोविंद मेंदे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा व स्पर्धा परीक्षेला समोरे जाताना विध्यार्थ्यानी कशा पद्धतीने त्याचे नियोजन करावे यावर सखोल मार्गदर्शन केले.
प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी बदलती परीक्षा पद्धती व ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांची मानसिकता यावर उपाययोजनातमक पर मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणातून अरविंद मुसने यांनी विध्यार्थ्यानी जिद्द, चिकाटी, व प्रामाणिकपणा या तीन सूत्रीचा विध्यार्थ्यानी वापर करून स्पर्धा परीक्षेला समोर गेले असता यश नक्की मिळते असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रा. प्रवीण आंबटकर यांनी प्रस्ताविकेतून महाविद्यालयातर्फे नियमित आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी खेवले हिने केले, तर आभार प्रदर्शन समीक्षा पिंपळकर हिने मानले.