ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी टिळकांचे चरित्र अभ्यासले पाहिजे – ॲड. रवींद्रजी भागवत

चांदा ब्लास्ट

 आजच्या काळात विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. चित्त अस्थिर करणाऱ्या अनेक गोष्टी, मोबाईल सारखी साधने भोवताली असताना त्यातून स्वतःला स्थिर करता येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच विद्यार्थ्यांनी टिळकांचे चरित्र अभ्यासले पाहिजे.असे प्रतिपादन लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भागवत यांनी केले. ते लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

       १ ऑगस्ट शुक्रवार रोजी लोकमान्य टिळक स्मारक मंडळाद्वारे संचालित सर्व विद्यालयातर्फे आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दैनिक लोकसत्ता चे वृत्तसंपादक श्री रवींद्र जुनारकर उपस्थित होते. आपल्या मनोगतात श्री जुनारकर म्हणाले की सध्या समाज माध्यमांवर महापुरुषांच्या चारित्र्यहननाचे काम सुरू आहे.

त्यामुळे सामान्य माणसांनी बोलणे आता आवश्यक झाले आहे.जुनारकर पुढे म्हणाले की लोकमान्य टिळकांनी शंभर वर्षांपूर्वी मांडलेला अर्थ विचार अतिशय महत्त्वाचा आहे.100 वर्षांपूर्वी असा विचार करणारे टिळक हे द्रष्टे नेते होते. याप्रसंगी तिन्ही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कु. प्रेरिता भास्कर चौधरी (लोकमान्य टिळक विद्यालय), कु.सुप्रिया प्रकाश तोकलवार (लोकमान्य टिळक कन्या विद्यालय), कु.पूर्वा बालू रूपा रेल (लोकमान्य टिळक ज्ञानमंदिर) या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले.

 या प्रसंगी व्यासपीठावर स्मारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री श्रीपादजी मुनगंटीवार सचिव श्री गांगेय सराफ विराजमान होते.

    तर सभागृहात मंडळाचे कोषाध्यक्ष ॲड.श्री प्रशांत घट्टूवार, सहसचिव डॉ. प्रवीण पंत,सदस्य डॉ.राम भारत, ॲड.अभय पाचपोर व श्री दत्तप्रसन्न महादाणी तसेच माजी मुख्याध्यापिका सौ.जया भारत डॉ. सविता भट श्रीमती चवरे सौ.मंगला बंडीवार,श्री राजनहिरे श्री वसंत थोटे सौ.दर्शना थोटे, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मंडळाचे सचिव श्री. गांगेय सराफ यांनी करून दिला.

चारही शाळांच्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा अहवाल त्यांनी सादर केला तर मंडळाचे उपाध्यक्ष श्री श्रीपादजी मुनगंटीवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तन्वी ठाकरे व पीयूष गोपलानी यांनी केले.तर कु. नंदिनी घटे हिने गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये