बहिणाबाई विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील नोकेवाडा येथील बहिणाबाई विद्यालयात साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उत्तम कराळे व प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षक सतीश राठोड व नंदेश्वर खोब्रागडे हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम कराळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर घेऊन देशासाठी व समाजासाठी कार्य केले पाहिजे देशात आदर्श नागरिक निर्माण होण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज आहे.विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात महापुरुषांच्या संदर्भात विविध पुस्तके वाचून त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे तरच भविष्यात चांगला समाज निर्माण होईल.
तर प्रमुख पाहुणे सतीश राठोड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन साहित्यावर प्रकाश टाकला,यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना फकीरा कादंबरी विषयी माहिती दिली तसेच स्मशानातील सोन या त्यांच्या पाठातील मर्म विद्यार्थ्यांना सांगितले.
तर या कार्यक्रमाला शाळेतील सहशिक्षक संतोष निखाडे,संतोष इंद्राळे, प्रशांत पारखी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संघरक्षित तावाडे यांनी केले तर आभार छत्रपती काटकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी रमेश गायकवाड, बालाजी चव्हाण, विलास पेंदोर,पांडुरंग कांबळे यांनी परिश्रम घेतले.