ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपात प्रवेश घेण्यास नकार दिल्यामुळे माझ्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न

कृउबा समितीचे सभापती भास्कर ताजने यांची पत्र परिषदेत माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी सांगण्यात आले परंतु मी नकार दिल्यामुळेच माझ्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला अशी माहिती भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांनी पत्रकार परिषदेत दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १४ संचालकांनी दि.२४ जुलैला अविश्वास प्रस्ताव दाखल केला. याबाबतचे पत्र मला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले.यांनी हा संपूर्ण प्रकार जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या राजकीय घडामोडीनंतर झाला असल्याचा आरोप करीत मी सभापतीपदाचा राजीनामा देईल पण हे पद टिकविण्यासाठी भाजपात जाणार नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच उबाठा शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते भास्कर ताजने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संचालकांना विश्वासात न घेणे हा मुद्दा पटणारा नाही गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात असा कुठला आरोप झाला नाही. याबाबत आज पर्यंत कोणत्याच संचालकांनी तक्रार सुद्धा केली नाही. नियमानुसारच बाजार समितीचे सुरू आहे.१३ मे २०२३ ला कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यभार हाती घेतला तेव्हा बाजार समितीची आर्थिक स्थिती बिकट होती. कर्मचाऱ्यांचे ३० महिन्याचे वेतन थकीत होते. काही संचालकांची मदत घेऊन चंदनखेडा येथे वेज – ब्रिज काटा व शेड चे बांधकाम केले. त्या नंतरच्या दोन वर्षात बाजार समितीला वीस लाखाच्या आसपास उत्पन्न मिळाले. टाकळी व मुरसा येथे सीसीएफ मार्फत दोन्ह जिनिंग केंद्र सुरू केले त्यात ६० लाखाचे उत्पन्न मिळाले. या उत्पन्नातून २० महिन्याचे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन केला. दोन करोड रुपयाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन मंजूर करवून घेतले.

अविश्वासासाठी माझ्यावर केलेल्या आरोपाची शासनाने योग्य ती चौकशी केल्यानंतर सत्य काय आहे ते बाहेर येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकीय घडामोडीनंतर मला भाजपा मध्ये येण्याबाबत वारंवार फोन येत होते. मात्र मी खरा शिवसैनिक असल्यामुळे गेलो नसल्याने माझ्यावर अविश्वास आणून पदावरून हटविण्याचे हे मोठे षडयंत्र असल्याचे कोणाचीही नाव न घेता सभापती भास्कर ताजणे यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितल

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये