
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्वयंपाक का केला नाही या शुल्लक कारणावरून पती ने पत्नीच्या अंगावर पेट्रोल फेकून अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे मारण्यची धमकी दिल्याची घटना गारखेड येथे 29 जुलै रोजी दुपारी 2 वाजता घडली.
आरोपी पती संतोष भास्कर मस्के हा दारू पिण्याच्या सवइचा असुन पत्नी सौ दिक्षा हिला स्वयंपाक का केला नाही या कारणावरून अंगावर पेट्रोल फेकून अश्लिल भाषेत शिवीगाळ करून चापटाबुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली ,पत्नीने पोलिस ठाण्यात आज 31 जुलै रोजी दुपारी तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहे