आंतरराष्ट्रीय वाघ दिनानिमित्त केंद्रीय विद्यालय डिफेन्समध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आंतरराष्ट्रीय वाघ दिनाचे औचित्य साधून भद्रावती – चोरा प्रादेशिक क्षेत्रातील डिफेन्स वसाहतीमधील केंद्रीय विद्यालय डिफेन्स, भद्रावती येथे वाघ संवर्धनावरील PPT सादरीकरण आणि चित्रपट प्रदर्शन या जनजागृतीपर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
या विशेष उपक्रमाला शाळेच्या प्राचार्य मा. स्वाती विश्वकर्मा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. किरण धानकूटे सर, सहाय्यक क्षेत्र अधिकारी श्री. विकास शिंदे सर, तसेच बीट गार्ड श्री. संदीप पर्वे सर यांचा समावेश होता.
कार्यक्रमासाठी सार्ड संस्थेचे श्री. श्रीपाद बाकरे, अनुप येरणे, शैलेश पारेकर, आणि आशिष चाहकटे यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी सार्ड संस्थेचे सर्व सदस्य, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच केंद्रीय विद्यालयाचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
भद्रावती – चोरा प्रादेशिक क्षेत्रातील डिफेन्स वसाहतीसारख्या ठिकाणी मानव व वन्यजीव यांचा निकटचा सहवास असल्याने अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. या उपक्रमाचे स्थानिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे