ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

रामपुरी जंगल शिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :-  तालुक्यातील मेंडकी पासून तीन की.मी.अंतरावरील मौजा नवेगाव खुर्द येथील रहिवासी जयपाल लक्ष्मण उईके वय 46 वर्ष हे नवेगावखुर्द येठील गुराखी असल्यामुळे तो नियमित नियत वनक्षेत्र लगतच्या रामपुरी जंगल शिवारात कक्ष क्रमांक 154 येथे गायी राखत होता.

त्याच परिसरात एका मोठ्या घनदाट झुडपात दबा धरून बसलेल्या मोठ्या पट्टेदार वाघाने जयपाल लक्ष्मण उईकेवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.या आधी दोन वर्षा पूर्वी याच रामपुरी जंगल शिवारात वाघाने एका वर हल्ला करून जखमी केले होते.नशीब बलत्तर म्हणून या हल्ल्यातून एक इसम वाचला.

जयपाल लक्ष्मण उईके यास उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयपाल उइके यांच्या पोटाच्या आतडया बाहेर निघाल्या असून पाठीला व हाताला आणि मानेला जबर जखमा असल्या मुळे आणि तो गंभीर जखमी असल्यामुळे सदर जखमीला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी येथील वन विभागातील अधिकारी करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये