ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण स्वास्थ्य सेवेसाठी रोगनिदान शिबीर ही जनचळवळ व्हावी – हंसराज अहीर

कार्यक्रमास तालुक्यातील महिलावर्गाची बहुसंख्येने उपस्थिती होती

चांदा ब्लास्ट

ग्रामिण क्षेत्रातील लोकांच्या आरोग्याची निगा व रक्षणाकरिता आरोग्य शिबीरांचे आयोजन बदलत्या काळाची गरज आहे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील धुरीणांनी, राजकीय पक्षांनी, रोटरी कल्ब व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेवुन ठिकठिकाणी दुर्धर व अन्य आजारांशी निगडीत रोगनिदान शिबीरांचे आयोजन करीत या कार्यास जनचळवळीचे स्वरुप देत सामाजिक कर्तव्य पार पाडावे असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यंनी केले.
वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. 1 ते 5 जुलै 2023 पर्यंत आयोजित भव्य मॅमोग्राफी टेस्ट शिबीरास उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करतांना अहीर बोलत होते. या कार्यक्रमास राज्याच्या पूर्व मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, रमेश राजूरकर, बाबा भागडे, डाॅ. भगवान गायकवाड, अहेतेशाम अली, सुरेश महाजन, करण देवतळे, डाॅ. सागर वझे, सुवर्णरेखा पाटील, ओम मांडवकर, डाॅ. अभिषेक जोशी, उपसंचालक (आरोग्य), प्रफुल फुजे, अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय, डाॅ. बाळु मुंजनकर वैद्यकीय अधिकारी, राजू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना हंसराज अहीर यांनी डाॅ. सागर वझे यांच्या रुग्णाभिमुख कार्याची प्रशंसा केली. दत्ताजी मेघे यांच्या अभिमत विद्यापीठाद्वारे होणाÚया सामाजिक योगदानाचा सुध्दा त्यांनी गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. ते म्हणाले की, प्रधानमंत्री मोदीजींच्या राजवटीत स्वास्थ्य सुविधा प्रगत झाली असुन अनेक साथीच्या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आले आहे. आरोग्य क्षेत्रास स्वयंपूर्णता लाभण्यासाठी अद्ययावत रुग्णालये, एम्स हाॅस्पीटल्स, नर्सिंग काॅलेजेसची मोठ्या प्रमाणात उभारणी करण्यात आली आहे. स्वास्थ्य सेवेबाबत अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सांगुन आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सुमारे 39 हजार जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहे. आयुष्यमान योजनेद्वारा 5 लाख रुपये उपचारार्थ दिले जात आहे. देशात औषधी निर्मिती, लसींची निर्मिती होत असुन देशाची औषधी निर्यात करणारा देश म्हणून ओळख झाली आहे असेही ते म्हणाले.
वरोरा शहरात 5 दिवसीय ब्रेस्ट कॅन्सरचे निदान शिबीर ग्रामिण माता भगिनींसाठी वरदान ठरणारे असले तरी या रुग्णांचे प्रमाण नगण्य ठरावे अशी भावना व्यक्त करीत त्यांनी अशा शिबीरातून इतरांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी ग्रामिण क्षेत्रातील लोकांमध्ये आरोग्या विषयी दुर्लक्ष व अनास्था असल्याने त्यांच्या आरोग्याप्रती स्वास्थ्य यंत्रणांनी जागृत राहुन ग्रामिण क्षेत्रातील लोकांना प्रभावी सेवा देण्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. बेटी बचाव, बेटी पढाव या योजनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्याप्रती जागरुकता व सक्षमीकरणावर भर दिला जात असल्याने महिलांच्या आरोग्यामध्ये मोठी सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले आरोग्य सेवा ही ग्रामिण क्षेत्रात सर्वदूर पोहचविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी देवराव भोगळे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील महिलावर्गाची बहुसंख्येने उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये