ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोणी येथे राष्ट्रीय गळीत धान्य व तेल ताड अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नाजिकच्या लोणी (ता. कोरपणा) येथे राष्ट्रीय गळीत धान्य व तेल ताड अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. एस. एम. तोटावर, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, चंद्रपूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विश्वासराव जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी, राजुरा, श्री. गोविंद ठाकूर, तालुका कृषी अधिकारी, कोरपणा आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. रोशन मेश्राम, महात्मा गांधी महाविद्यालय, गडचांदूर उपस्थित होते.

कार्यक्रमात श्री. गोविंद ठाकूर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत करावयाच्या कामांबाबत मार्गदर्शन केले. प्रा. रोशन मेश्राम यांनी सोयाबीन आणि कापूस पिकांविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात श्री. तोटावर यांनी जमिनीची खालवलेली प्रत सुधारण्यासाठी उपाययोजना आणि सोयाबीन व कापूस पिकांवरील निविष्ठा खर्च कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. स्वरूप भोसले, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले, तर प्रगतशील शेतकरी श्री. घनश्याम नांदेकर यांनी आभार प्रदर्शन केले. लोणी गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये