ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सावली येथे कॅन्सर मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
प्राथमिक स्वास्थ्य केंद्र जिबगाव व टाटा ट्रस्ट च्या वतीने सावली येथे जुनी नगरपंचायत इमारतीमध्ये असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात संशयित कॅन्सर मोफत तपासणी शिबिराच्या आयोजन केलेले आहे.
दिनांक 1 ऑगस्टला सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या तपासणी शिबिराच्या आयोजन केलेले आहे. या शिबिरात तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर व इतर आरोग्य ची तपासणी तज्ञ डॉक्टारांच्या चमू कडून शिबिरात होणार असून या शिबिराच्या जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभाग व टाटा ट्रस्ट च्या वतीने करण्यात येत आहे.