ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेमुळे रोहनकर कुटुंबाला तातडीची १० लक्ष रुपयांची मदत

आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते १० लाखांचा धनादेश तात्काळ सुपूर्द

चांदा ब्लास्ट

कठीण प्रसंगी रोहनकर कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे राहिले आ. मुनगंटीवार

चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील वृत्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. मातृछत्र गमावलेल्या एका कुटुंबाला त्यांच्या तत्परतेमुळे तातडीने आर्थिक मदत मिळाली. या कृतीमुळे त्यांच्यातील एक आदर्श लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

गोंडपिपरी येथील वास्तु कार्यक्रमावरून परत येत असताना बामणीजवळ (बल्लारपूर) झालेल्या दुर्दैवी ट्रक अपघातात चंद्रपूरच्या छोटा बाजार येथील रहिवासी श्रीमती नीलिमा देवराव रोहनकर यांचे निधन झाले. या दुःखद घटनेनंतर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ पुढाकार घेत रोहनकर कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून दिला.

प्रभाग क्रमांक ७ जटपुरा येथील नगरसेवक श्री. रवी वामनराव लोणकर यांनी या घटनेची माहिती आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत लॉयड्स मेटल्सचे सिनियर जनरल मॅनेजर यांना श्री अमित जयसिंग यांना या घटनेसंदर्भात माहिती देत लॉयड्स मेटल्स कंपनीकडून तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात मृतक महिलेचे पती श्री. देवराव रोहनकर, मुलगी निरुपा व नातेवाईकांची भेट घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना धीर दिला. त्यांच्या पुढाकारातून लॉयड्स मेटल्सकडून तातडीने १० लाख रुपयांचा धनादेश मंजूर करून तो सुपूर्द करण्यात आला.

हा आर्थिक आधार त्यांच्या दुःखाची भरपाई करू शकत नाही; मात्र या कठीण प्रसंगी आपण त्यांच्या सोबत आहोत, ही भावना व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले. रोहनकर कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो आणि दिवंगत आत्म्यास सद्गती मिळो, हीच प्रार्थना आ.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये