गेवरा (बु.)येथील तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील गेवरा(बु.) येथील युवकांची दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रशांत विठ्ठल चौधरी,रा. गेवरा (बु.)वय 32 वर्ष या तरुण युवकांने मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास गोविंदा विठ्ठल चौधरी यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात लोखंडी अँगल ला दारूच्या नशेत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवीली या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी एका तरुण युवकाच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाथरी पोलिसांना माहिती मिळतात घटनास्थळ गाठून पंचनामा करून शव शवविच्छेदनास पाठवण्यात आले या घटनेच्या पुढील तपास पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितेश डोर्लीकर, पो.ह. मडावी, पो. अ. खैलेश कोरे, मेघशाम गायकवाड, लक्ष्मीकांत खंडाळे, सुरेश शेंडे, बळीराम बारेकर करीत आहे.