ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी असं काय केलं? की, मुलींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले

आई बाबांचा मनाला मिळाली शांती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

       गडचांदूर भोयेगाव मार्गावरील तळोधी (बाखर्डी) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गडचांदूर जावे लागते गावात बस येते पण ती सकाळी ११ वाजताच्या नंतर येत असल्याने शाळकरी मुलांना या बसचा काहीही उपयोग होत नव्हता. परिणामी शाळकरी विद्यार्थाना लिफ्ट मांगत शाळेत जावे लागत आहे.

सदर बाब गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सांगितले कि, त्यांना दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, जीप, कार वेळ आल्यास बैलबंडीने सुद्धा लिफ्ट मागून शाळेत जावे लागत आहे, हीच परिस्थिती येताना सुद्धा आहे. एकीकडे देशात व राज्यात महिला असुरक्षतेचा प्रश्न गंभीर असताना जो पर्यंत आपली मुलगी महाविद्यालयातून वा शाळेतून सुखरूप घरी परत येत नाही तो पर्यंत पालकांचा जीव धाकधुकीत राहतो, असे सांगितले होते. गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात बस सुरु करण्याच्या मागणीसाठी शाळकरी मुलांसोबत गावातील महिलांनी सुद्धा नारेबाजी करत आंदोलन केले होते.

राजुरा आगार व्यवस्थापकाना निवेदनही देण्यात आले होते. मात्र तत्कालीन सरकार हे महिला विरोधी असल्याने त्यांचे धोरण महिलांना त्रास झाला तरी चालेल असे असल्याने, निवेदने आंदोलन करूनही बस ची वेळ बदलवण्यात आली नाही. शेवटी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी महिला व विद्यार्थिनींची सुरक्षा सर्वोपरी पाहता तळोधी (बाखर्डी) येथील विद्यार्थी, विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालयात जाणे येणे करिता ऑटोची व्यवस्था करून दिल्याने मुलींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि आई बाबांचा मनाला शांती मिळाल्याचे पाहण्यात येत असून सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये