ताज्या घडामोडी

तेलंगणा राज्यातील ट्रकने होतेय गोवंशाची तस्करी – स्थानिक गुन्हे शाखेने दिले मुक्या प्राण्यांना जीवनदान

20 गाई व 10 बैलांना सुखरूप सोडविले मात्र एका गाईचा झाला होता मृत्यु - 24 लाख 17 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

 

चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून दि. 12/09/2023 रोजी राजुरा तालुक्यातील विरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तेलंगणा राज्यात गोवंशाची अवैध वाहतूक सुरू असून ह्या मार्गाने 16 चाकी ट्रकमध्ये अवैधरीत्या जनावर भरून कत्तली करीता तेलंगाना राज्यात घेवून जाणार आहे.

प्राप्त गुप्त सुचानेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि महेश कोंडावार यांनी स.पो.नि. जितेंद्र बोबडे, पो. हवा. सुरेंद्र महतो, ना.पो.कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, पो.कॉ. गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, जय सिंग यांचे पथक कारवाई करीता नेमून यांना संदर्भिय भागात सापळा रचुन अवैध गोवंश वाहतूक थांबविण्याचे आदेश दिले. पथकाने सोनुर्ली फाटयाचे आधी रोडवर सापळा रचला व काही कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी केली असता त्यांना एक ट्रक येतांना दिसला. संशयावरून त्या ट्रक चालकास थांबण्याचा ईशारा केला असता तो पोलीसांना पाहून ट्रक न थांबविता पळू लागला. अखेरीस त्याचा पाठलाग केला असता सोनुर्ली फाट्या जवळ ट्रक सोडून चालकाने पळ काढला.

ट्रक क्र. TS 12 UD 9233 ची पाहणी केली असता त्यात एकुण गोवंश 31 ज्यात जिवंत स्थितीत असलेल्या 20 गाई व 10 बैल तर मृतावस्थेत असलेली 01 गाय आढळुन आली. स्थानिक गुन्हे शाखेने पंचनामा करून अंदाजे 4,17,000/- रूपये किंमतीचे गोवंश व ट्रकची किंमत 20,00,000/- असा एकूण 24,17,000/- रू चा मुद्देमाल पंचा समक्ष ताब्यात घेतला. सदर ट्रक चालकाविरुद्ध पो.स्टे. विरूर येथे 429 भादवि सहकलम 11(1) (ड) प्रा. नि. वा. कायदा 1960, सहकलम 5 अ (1) 5 ब9.11 महा.प्रा. संरक्षण कायदा, सहकलम 83,130 / 177 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स.पो.नि. जितेंद्र बोबडे, पो. हवा. सुरेंद्र महंतों, ना पो.कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, पो.कॉ. गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, जय सिंग यांचे मदतीने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. विरूर हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये