ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद

'स्व.वामनराव गड्डमवार जयंतीचे औचित्य' "१९७० शिबिरार्थीने घेतला लाभ," "भारत शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम"

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे संंस्थापक अध्यक्ष. स्व.वामनराव गड्डमवार यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबीर चे आयोजन करण्यात आले. यावेळी सावली तालुक्यातील १९७० शिबिरार्थीने सदर.शिबिरात हजेरी लावून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

माजी राज्य मंत्री तथा भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे संस्थापक अध्यक्ष स्व.वामनराव गड्डमवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले, मोफत आरोग्य तपासणी व औषधी वितरण शिबिरात सावंगी मेघे येथील जनरल.फिजीशियन,बालरोग तज्ञ,दंत रोग तंज्ञ,स्त्री रोग तज्ञ,नाक ,कान घसा तज्ञ,सर्जरी तज्ञ,उपस्थित होते.

    सदर शिबिरात ब्लड प्रेशर,ईसीजी,मेमोग्राफी,ब्लड शुगर,सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या,गर्भवती व स्तनदा.मातांची तपासणी, त्वचा रोग आजार.तपासणी करण्यात आली.

तपासाअंती पोटाचे.विकार,किडनी,पायाची सर्जरी, नाक,कान,घसा,बहिरेपणा,अपेंडिस,हर्निया आदी आजार निष्पन्न झालेल्या रुग्णांना.दत्ता मेघे उच्च शिक्षण व.संशोधन संस्था,सावंगी मेघे,येथील रुग्णांलयात उपचारासाठी पहिली टिम रवाना झालेली आहे.यात विविध आजाराचे २५ रुग्णांना पाठविण्यात आले.

स्व.वामनराव गड्डमवार जयंती सोहळा,आणि आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीमती सुशीला गड्डमवार यांच्या हस्ते झाले.

यावेळी मंचावर आम सुभाष धोटे,आम.सुधाकर अडबाले,माजी आ.देवराव भांडेकर,नामदेव उसेंडी,जिमस बॉंकचे अध्यक्ष संतोष रावत,डॉ अनिल शिंदे,दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे शिबीर संयोजक डॉ. वसंत वाघ,डॉ वैभव चंद्रा,संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार, नंदा अल्लुरवार,सावलीच्या नगराध्यक्ष लता लाकडे,उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार, कार्यकारी प्राचार्य डॉ खोब्रागडे, भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत सावली, कुनघाडा,भेंडाळा,मारोडा,बोथलीचे सर्व मुख्याध्यापक, तथा शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये