ताज्या घडामोडी

राजुरा तालुक्यातील रेती तस्करांवर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ट्रॅक्टर सह 202500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

दि. 12/09 / 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार राजुरा हद्दीत गोवरी कॉलनी ते गोवरी खदान रोड लगतच्या नाल्यातून टॅक्टर ने अवैध रेती वाहतुक होत असल्याच्या खात्रीशीर माहितीवरून वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. महेश कोंडावार यांनी पो. हवा. सुरेंद्र महतो, ना.पो.कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, पो.कॉ. गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, जय सिंग यांचे पथक कारवाई करीता नेमून त्यांना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेशीत केले.

सदर पथक मिळालेल्या खबरे प्रमाणे गोवरी कॉम्पलेक्स जवळ चौकामध्ये नाकाबंदी करून टॅक्टर क्र. एम. एच. 33 एफ 0491 थांबवून ट्रॅक्टरचे ट्रॉलीची पाहणी केली असता त्यात अर्धा ब्रास रेती दिसून आली. रेतीचे वाहतुकी बाबत चालकास पास परवाना विचारला असता त्याने नसल्याचे सांगीतले. म्हणजेच सदर ट्रॅक्टर मधुन रेतीची तस्करी सुरू असल्याचे उघड होत असल्याने सदर रेती व ट्रॅक्टर असा एकूण 5,02,500/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ट्रॅक्टर चालक नितीन आनंदराव टेकाम वय 32 वर्षे धंदा ड्रायव्हर रा. माणिकगड चुनाळा ता. राजूरा जि.चंद्रपूर याचे विरूद्ध पो.स्टे. राजुरा कलम 379 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोहवा. सुरेंद्र महतो, ना.पो.कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, पो. कॉ. गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, जय सिंग यांचे मदतीने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास राजूरा पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये