कृषीकंपन्यानी घेतली कृषी व कृषी निगडित व्यवसाय विमा योजनांची माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
उंबरखेड येथे आयोजित रावे उपक्रमामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय देऊळगावराजा येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थिनींनी स्टेट बँकेच्या देऊळगाव राजा शाखेला अभ्यासपूर्ण भेट दिली. यावेळी बँक व्यवस्थापक अंकुश रोडे यांनी शेतकऱ्याला फायदेशीर शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय, कर्ज, शासकीय अनुदान,याविषयी यांनी मार्गदर्शन केले. तसेच सध्या प्रचलित असलेले एस बी आय योनो ऍप बद्दल उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले, फायदे आणि सुयोग्य वापर कसा करावा हे सांगितले.
कर्ज, कर्जाचे फायदे कर्जमाफी (सबसिडी) अटी व तरतुदी कर्जासाठी लागणारी योग्य ती डॉक्युमेंट यादी आणि कर्जभरणी अर्ज यासंबंधात सखोल मार्गदर्शन केले आणि एस बी आय मध्ये शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होत नसल्याचे सांगून फायदेशीर असल्याचे पटवून दिले . तसेच बँक व्यवस्थापक यांनी बँकेत आपली खातें नोंद करून घेण्याचे आवाहन केले.यासोबतच शेतकऱ्यांपर्यंत योग्य पिकविमा माहिती पोहोचवण्याचे आणि योग्य वेळी कर्ज भरण्याची आवाहन केले यावेळी बँक व्यवस्थापक यांनी खूप चांगला प्रतिसाद देत योग्य मार्गदर्शन केले.
याप्रसंगी समर्थ कृषी महाविद्यालय चे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे इन्चार्ज मोहजित सिंग राजपूत आणि अर्थशास्त्र विभाग प्रा. नागरे सर यांच्या मार्गदर्शनात. यावेळी कृषी कन्या नेहा पडघान, जयश्री पाटोळे, गायत्री शिंगणे, श्वेता पवार,ऋतुजा वाघ,नेहा लहाने, दुर्गा मापरी, टिना झोडे, अंजली खिराडे यांचा समावेश होता.