डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या संचालक पदी डॉक्टर श्रद्धा बेले यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दक्षिण भारत जैन सभेचे 103 वे अधिवेशन नुकतेच हारुगेरी तालुका रायबाग जिल्हा बेळगावी येथे संपन्न झाले या अधिवेशनात समाजाची पुढील कामाची दिशा समाजाला भेडसावत असणाऱ्या समस्या जैणांचे गुरु जैन मुनि व जैन साध्वी यांना विहारात होत असलेला त्रास व त्यांचे होत असलेले वाढते.
अपघात यामध्ये केंद्र सरकारने आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा करणे, देशभरातील जैनांचे तीर्थक्षेत्रावर दिवसेंदिवस अजैन मंडळीकडून होत असलेला त्रास पाहता यावर कायमस्वरूपी बंदोबस्त कसा करता येईल यावर विचार विनिमय करून त्या त्या राज्याच्या राज्यप्रमुखांना व त्या त्या राज्यातील पोलीस महासंचालकांना पत्र व्यवहार करणे बाबत ठराव पारित करण्यात आले
तर याच अधिवेशनामध्ये समाजासाठी ज्या ज्या धर्मानुरागी यांनी योगदान दिलेले आहे त्यांचा सन्मान करण्यात आला व पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल (नियोजित) सांगली यांचे संचालक पदी डॉक्टर सौ श्रद्धा शितलप्रसाद बेले समडोली यांची एकमताने समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या सदहेतूने नियुक्ती करण्यात आलेली आहे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, चेअरमन संजय शेटे, व्हॉईस चेअरमन अभिनंदन पाटील, मुख्य महामंत्री अनिल बागणे, खजिनदार बाळासाहेब पाटील, संघटन मंत्री शशिकांत राजोबा यांच्या संयुक्त स्वाक्षरीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात नमूद आहे की,
आपणास सामाजिक प्रश्नांची जाणीव असून आपण सामाजिक संघटन वाढीसाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे ही जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडीत जैन समाजाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या सभेचे जैन संघोsस्तु मंगलम हे ब्रीद सार्थक करावे असा दक्षिण भारत जैन सभेला विश्वास आहे त्यांच्या निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर श्रद्धा बेले यांनी सांगितले की मी करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल दक्षिण भारत जैन सभेने घेऊन माझे वर जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडण्याचा प्रयत्न करेल.