उप्परवाही येथे संजय गांधी निराधार योजनेचे ५० प्रकरणे निकाली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मागील अनेक दिवसा पासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ्यांचे तांत्रिक चुका व कागदपत्रे सादर न केल्याने उप्परवाही गावात अनेक प्रकरणे प्रलंबित होते.
या सदर्भात लाभार्थ्यांनी बरेचदा कार्यालयाचा चकरा देखील मारल्या परंतू समस्या सुटत नव्हत्या अखेर आमदार देवरावदादा भोंगळे यांचा पुढाकाराने, गजानन बुऱ्हाण यांचा नेतृत्वात उप्परवाही गावात विशेष शिबिर लावण्यात आले. यावेळी गावातील अनेक नागरिकांनी शिबिरात सहभाग दर्शवत १२२ प्रकरणे उपस्थित असलेले तालुका अधिकारी यांचा समक्ष सादर करण्यात आले त्यातील ५२ प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात आले. तर उर्वरित प्रकरणात कागदोपत्राची पूर्तता करण्यास सांगितले.
प्रसंगी माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना व भाजपा कोरपना तालुका अध्यक्ष संजय मुसळे, सरपंचा गीताताई सिडाम, उपसरपंच अनिल कौरासे, ग्रामसेवक महेश मिलमिले, तलाठी सतीश राजने, रवी बंडीवार, पुरुषोत्तम धाबेकर, तालुक्यातील कर्मचारी वैभव आंबेकर, ऑपरेटर मुरली जिल्हावार, उपस्थित होते. यावेळी राजेंद्र लोणगाडगे यांनी उपस्थित मान्यवर व तालुका कर्मचारी यांचे आभार मानले.
शिबिर यशस्वितेकरिता यशवंत धांडे, किसन मुसळे, सूरज पानघाटे, नरेश पुलगमकर, शंकर आत्राम, शुभम पत्रकार, कवडू मते, प्रणय पत्रकार, सचिन वडकी, यांनी परिश्रम घेतले.