ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मरकलमेटा येथील अंगणवाडी केंद्राची दुरवस्था

बालविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

      मरकलमेटा गावातील अंगणवाडी केंद्र गेल्या दोन वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असून, येथे विषारी साप आणि उंदीर-घुशींचा विळखा वाढला आहे. यामुळे पालक आपल्या मुलांना अंगणवाडीत पाठवण्यास नाखुष आहेत. नवीन इमारत बांधण्याची किंवा विद्यमान इमारतीच्या दुरुस्तीची मागणी स्थानिकांनी वारंवार बालविकास अधिकाऱ्यांकडे केली; परंतु, अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

   सध्या अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या कुडामातीच्या घरात अंगणवाडी भरवली जात आहे. या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध नसून, पावसाळ्यात चिखल होत असल्याने लहान मुलांना बसण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. याकडे तातडीने लक्ष देऊन अंगणवाडी इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. वैजनाथ सूर्यवंशी यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये