ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा स्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगीरी

यात चांदा पब्लिक स्कुलच्या वयोगट १४ व १७ वर्षाआतील मुली व मुलांचा समावेश

चांदा ब्लास्ट

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र, पूणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर तथा जिल्हा क्रिडा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रिडा संकूल येथे दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा स्तरीय ज्युदो स्पर्धा पार पडली. यात चांदा पब्लिक स्कुलच्या वयोगट 14 व 17 वर्षाआतील मुली व मुलांचा समावेश होता.

ज्युदो या स्पर्धेत चांदा पब्लिक स्कूलच्या वयोगट 14 व 17 मुलं-मुली वजन गटानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावून विभागीय स्तरावर आपले नाव नोंदविले. 35 किलो खालील 14 वर्षातील मूले रूद्र राजू मारशेट्टीवार व 40 किलो खालील महोम्मद अयुब मोहम्मद ने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर नाव नोंदविले. 50 किलो खालील अयान इब्राहीम शेख याने तृतीय क्रमांक पटकविला तसेच 17 वर्षाखालील मुलें वजन गट 45 किलो खालील केतन विलास पाऊनकर, 55 किलो खालील मंथन दिवाकर बेहार, 66 किलो खालील प्रज्वल सुनिल जनकर, 90 किलो वरील देवेन दिपक गोणेवार या विद्यार्थ्यांची विभागीय ज्युडो स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. तसेच 81 किलो खालील जय अभय बोधे याने द्वितीय क्रमांक पटकविला. 17 वर्षातील मुली 57 किलो आतील अक्षरा अमीत चकनलवार हिची देखील ज्युदो विभागीय क्रिडा स्पर्धेकरिता निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या भरघोष यशात चांदा पब्लिक स्कूलचे क्रिडा शिक्षक श्री. अमर कडपेवाले यांची मोलाची भूमिका आहे. त्यांनी कठोर मेहनत घेवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले.

विद्यार्थ्यांना नेहमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगुन सतत प्रयत्नशील राहण्यासाठी प्रोत्साहीत करणा-या शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी विजयी संघाचे कौतुक करून पुढील विभागीय ज्युदो स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये