ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद हायस्कूल, भटाळा येथे दप्तर विना शाळा उपक्रम राबविला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद हायस्कूल भटाळा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील शाळेत दिनांक 13 जुलै रोज शनिवारला दप्तरा विना शाळा या उपक्रमांतर्गत वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रम सादर केले वर्ग पाच ते नऊच्या विद्यार्थ्यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला

तसेच वर्ग दहावीच्या विद्यार्थिनींनी प्लास्टिक मुक्त अभियान तसेच पोस्टर स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये प्लास्टिकचे भविष्यात होणारे दुष्परिणाम यावर आधारित कुमारी अंजली बावणे वर्ग दहावा या विद्यार्थिनींनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन भविष्यात पृथ्वी वाचवा प्लॅस्टिक मुक्त भारत करा असा नारा देऊन सर्वांना सर्वांना जागृत केले याप्रसंगी आजच्या उपक्रमाची सुरुवात कवायत योगा या तासिकेने सुरुवात झाली कवायतीचे तसेच योगाचे प्रात्यक्षिक श्री रमेश ढवस व पचारे मॅडम यांनी सादर केले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री शालिक डुकरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती बावनकर मॅडम श्री आवळे सर श्री ढवस सर श्री काळे सर पचारे मॅडम बनसोड सर टोंगे ताई उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये