ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शॉर्टसर्किटमुळे शेतातील चारा जळून खाक

5 लाख रुपयांचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहराजळील कुंभारी येथील शेतकरी भीमा शंकर लाड व प्रवीण शंकर लाड यांच्या शेतात शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत पशुखाद्य, ज्वारी चा चारा, कृषी साहित्य जळाल्याने 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 6एप्रिल ला घडली,

चिखली रोड वर असलेल्या कुंभारीयेथील जैन फॉर्म जवळ असलेल्या डी पी मधून शॉर्ट सर्किट झाले, त्यामुळे आग लागून शेतातील चारा, विकत घेतलेला चारा, असा एकूण 16 हजार पेंढी चारा,3 क्विंटल शाळू, आणि 20 ट्रॉली शेणखत असे एकूण 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ केली मात्र आटोक्यात आली नाही,जैन फॉर्म चे नेट सुद्धा एका बाजूने जळाले, घटनेचा पंचनामा प्रभारी सहाय्यक अभियंता रवी खरात यांनी घटनास्थळी केला, महावितरण कंपनीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी पीडित शेतकरी भीमा लाड व प्रवीण लाड यांनी केली आहे.

राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार चे तालुका अध्यक्ष रवी इंगळे, शंकर वाघमारे यांनी घटनस्थळाला भेट देऊन तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये