ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा नगर पालिकाने शहरात विविध परिसरात केले वृक्षारोपण

शहरातून काढली वृक्ष दिंडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा नगरपरिषद तर्फे शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले . छत्रपती श्री शिवाजी हायस्कूल येथून वृक्ष दिंडी काढून जनजागृती करण्यात आली.

         जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या संकल्पने नुसार एक विद्यार्थी एक वृक्ष या उद्दिष्ट प्रमाणे दिनांक २ जुलै ते ४ जुलै या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले छत्रपती श्री शिवाजी हायस्कूल येथून वृक्षदिंडी काढण्यात आली .या वृक्ष दिंडी ला उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी हिरवी झेंडी दाखवली.नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ’ पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, शिक्षक वृंद, नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पत्रकार मान्यवर या वृक्ष दिंडीमध्ये सहभागी झाले होते.या दिंडीमार्फत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश शहरात देण्यात आला सिविल कॉलनी दत्तनगर मार्गे या दिंडीचा समारोपप शिवाजीनगर येथे झाला.मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन करून येथील खुल्या परिसात वृक्षारोपण करण्यात आले.

      वृक्षारोपण प्रसंगी उपविभागीय अधिकारी संजय खडसे, नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, माजी नगरसेवक नंदन, विजय, देवउपाध्ये, हनीफ शहा, नवनाथ गोमधरे,दीपक बोरकर, बाळू शिंगणे,वनश्री जनाबापू मेहेत्रे, मनिष काबरा, सुनील शेजुळकर ,चंद्रकांत खरात , तालुक्यातील सर्व पत्रकार ,नगर परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी कार्यालयीन अधीक्षक राजू जाधव ,विद्युत विभागाचे प्रमुख मुंडे , संजय जाधव ,तायडे , नितेश नागवे ,संमती जैन ,राजेंद्र वानखेडे ‘नसीर भाई ,शिंगणे मॅडम ‘ सर्व इंजिनिअर प्राचार्य देशमुख सर शिवाजी हायस्कूलचे मराठी व उर्दू विभागाचे शिक्षक पालिकेचे कर्मचारी ‘ विद्यार्थी शिवाजी हायस्कूल व समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आदींनी वृक्षारोपणा मध्ये आपला सहभाग नोंदविला . व शहरातील विविध भागात वृक्षारोपण केले .

       शहरातील श्री शिवाजी हायस्कूल – दत्तनगर – शिवाजीनगर सिविल कॉलनी – आदर्श कॉलनी – पिंपळनेर – आमना नदी परिसर – प्राथमिक शाळाआदी भागामध्ये पालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या पुढाकाराने व यशस्वी नियोजनामध्ये पावसाळ्याच्या पर्वावर संपूर्ण शहरात वृक्ष लागवड कार्यक्रम होत आहे .नागरिकांनी वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अरूण मोकळ यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये