महाराष्ट्र

आरोग्य व्यवस्था कुचकामी : खिर्डी उपकेंद्राला उपसरपंचानी ठोकले टाळे

चांदा ब्लास्ट :गडचांदूर

चंद्रपूर जिल्हातील आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरली आहे.सामान्य रुग्णांचे बेहाल सुरु आहे. प्रशासनाला आरोग्य सुविधा पुरविण्याचा वारंवार सूचना देऊनही त्याकडे फार गांभीर्याने प्रशासनाने बघितले नाही याला वैतागलेल्या उपसरपंचानी उपकेंद्राला टाळे ठोकले.हा प्रकार कोरपना तालुक्यातील खिर्डी येथे घडला.

जिल्हातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या नांदा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या खिरडी गावात आरोग्य सुविधेचा अभाव आहे. त्याला कारण ठरले येथील आरोग्य सेविका. आरोग्य सेविका मुख्यालयाला हजर राहत नाही. परिणामी वेळेवर रुग्णांना उपचार मिळू शकत नाही.यामुळे गावकरी संतप्त झालेत. त्यांनी ही समस्या उपसरपंच दीपक खेकारे यांना  सांगितलं.खेकारे यांनी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गावातील नागरिकांना सोबत घेऊन खेकारे यांनी आज उपकेंद्राला कुलूप ठोकले.दोन तासानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी भेट दिली.एक महिन्याच्या आत मी मुख्यालयाला राहील,असे लेखी आश्वासन आरोग्य सेविका यांनी लिहून दिल्यानंतर आरोग्य उपकेंद्राला लावलेले कुलूप उघडण्यात आले.

शासन कर्मचाऱ्यांना पगार देतात परंतु कर्मचारी नियमाची पायमल्ली करतात सदर आरोग्य सेविकांनी उद्धट भाषेत माझ्याशी संभाषण केले असून असा लोकप्रतिनिधी चा अपमान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाही करायला हवी

दिपक खेकारे

उपसरपंच ग्रा.प. खिर्डी

,,फोटो,,

आरोग्य व्यवस्था कुचकामी : खिर्डी उपकेंद्राला उपसरपंचानी ठोकले
टाळे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

चंद्रपूर जिल्हातील आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरली आहे.सामान्य रुग्णांचे बेहाल सुरु आहे. प्रशासनाला आरोग्य सुविधा पुरविण्याचा वारंवार सूचना देऊनही त्याकडे फार गांभीर्याने प्रशासनाने बघितले नाही याला वैतागलेल्या उपसरपंचानी उपकेंद्राला टाळे ठोकले.हा प्रकार कोरपना तालुक्यातील खिर्डी येथे घडला.

जिल्हातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या नांदा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या खिरडी गावात आरोग्य सुविधेचा अभाव आहे. त्याला कारण ठरले येथील आरोग्य सेविका. आरोग्य सेविका मुख्यालयाला हजर राहत नाही. परिणामी वेळेवर रुग्णांना उपचार मिळू शकत नाही.यामुळे गावकरी संतप्त झालेत. त्यांनी ही समस्या उपसरपंच दीपक खेकारे यांना सांगितलं.खेकारे यांनी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गावातील नागरिकांना सोबत घेऊन खेकारे यांनी आज उपकेंद्राला कुलूप ठोकले.दोन तासानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी भेट दिली.एक महिन्याच्या आत मी मुख्यालयाला राहील,असे लेखी आश्वासन आरोग्य सेविका यांनी लिहून दिल्यानंतर आरोग्य उपकेंद्राला लावलेले कुलूप उघडण्यात आले.

शासन कर्मचाऱ्यांना पगार देतात परंतु कर्मचारी नियमाची पायमल्ली करतात सदर आरोग्य सेविकांनी उद्धट भाषेत माझ्याशी संभाषण केले असून असा लोकप्रतिनिधी चा अपमान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाही करायला हवी

दिपक खेकारे
उपसरपंच ग्रा.प. खिर्डी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये