रोटरी क्लब भद्रावती 2025-26 ची नवीन कार्यकारिणी घोषित
अध्यक्ष प्रवीण महाजन, सचिव विक्रांत बिसेन तर कोषाध्यक्षपदि आनंद क्षिरसागर यांची नियुक्ती : 15 जुलैला होणार पदग्रहण सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
रोटरी क्लब भद्रावतीच्या 2025-26 यावर्षाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ मंगळवार, दिनांक 15 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता स्वागत सेलिब्रेशन हॉल अली पेट्रोल पंप येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात अध्यक्षपदी प्रवीण महाजन, सचिव विक्रांत बिसेन, तर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी आनंद क्षिरसागर स्वीकारणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर मनीष मूलचंदानी यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रमा गर्ग, भाविक तेलंग डिस्ट्रिक्ट ग्रीटिंग चेअर,भद्रावतीचे तहसीलदार राजेशजी भंडारकर, पोलिस निरीक्षक योगेशजी पारधी, नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेरकी, ग्रामीण रुग्णालय भद्रावतीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष सिंग, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,डॉ माला प्रेमचंद तसेच विविध पदाधिकारी मान्यवर व नागरिक उपस्थित राहणार आहेत.