ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पीएम श्री सावित्रीबाई फुले शाळेचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत 9 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

चांदा ब्लास्ट

तर ॲबॅकस मधे 2 विद्यार्थी नॅशनल चॅम्पियन

चंद्रपूर : पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक मनपा शाळेने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश मिळवले असुन शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शिष्यवृत्तीस पात्रता मिळवली आहे.

   राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेच्या उत्तीर्ण 12 पैकी इयत्ता पाचवीतील अक्षित सुहास त्रिपतीवार तर इयत्ता आठवीतील भूमिका पवन निखाडे, कल्याणी संतोष आंबटकर, करण वामन पंधरे, केसीकौर केवलसिंग भोयर,कुमकुम नितेश शास्त्रकार, रिंपा विश्वजीत मुजुमदार,रोझीना रियाझुल सिद्दिकी, सोहम राजू सोरते असे एकुण 9 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत यश प्राप्त केले आहे. तर राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत शाळेच्या आवेश हसन शेख याने प्रथम तर गणेश अनिल ठाकरे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी या परीक्षेत महानगरपालिकेचे हजारो विद्यार्थी सहभागी होतात. ही परीक्षा यंदा 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा तसेच निकालात वृद्धी व्हावी, यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवित असतो.

   गेल्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांचा यशाचा आलेख उंचावत आहे.शाळांमध्ये मागील काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी वर्गातच करून घेतली जाते. शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाते. तज्ज्ञ शिक्षकांमार्फत ऑनलाइन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. या नियोजनबद्ध तयारीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या यशात स्पष्टपणे दिसून येत असल्याचा विश्वास आयुक्त विपिन पालीवाल यांनी व्यक्त केला.

   आयुक्त विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नागेश नित यांच्या प्रयत्नाने शाळेला यश प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविण्यात पाचवीचे वर्ग शिक्षक अजय माडोत, प्रणिता देशमुख तसेच आठवीचे वर्ग शिक्षक जोगेश्वर मोहारे, विषय शिक्षक सचिन रामटेके आणि मंगेश अंबादे यांचा मोलाचा वाटा आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये