ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्होकार्ड फाऊंडेशन व गेलच्या स्वास्थ्य सेवा कार्याचा हंसराज अहीरांद्वारे आढावा

फिरते रूग्णालय सर्वसमावेशक व ग्रामिण रूग्णांसाठी वरदान ठरावे- हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : ग्रामिण क्षेत्रातील रूग्णसेवेकरिता कार्यरत असलेल्या व्होकार्ड फाऊंडेशनच्या एचपीसीएल, बीपीसीएल तसेच गेलद्वारा पुरस्कृत फिरत्या रूग्णालयाच्या स्वास्थ्य विषयक कार्याचा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सविस्तर आढावा घेतला. या सेवेला सर्वसमावेशकता देतांनाच ही सेवा ग्रामिण भागातील रूग्णांसाठी वरदान ठरेल अशा पध्दतीने रूग्णसेवेला वाहून घ्यावे अशी भुमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.

      स्थानिक शासकीय विश्रामगृहात (12 जुलै) संपन्न आढावा बैठकीस फिरते अॅम्बुलॅन्स रूग्णसेवेतील वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, परिचारिका, को-आर्डीनेटर आदींची उपस्थिती होती. हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून लोकसभा क्षेत्रातील कोरपना, जिवती, राजुरा, झरी जामणी, घाटंजी, आर्णी, भद्रावती तालुक्यातील ग्रामिण क्षेत्रामध्ये 4 फिरत्या अॅम्बुलॅन्स रूग्णालयाद्वारे रूग्णसेवा सुरू असून हजारो रूग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत.

      यावेळी अहीर यांनी विविध आजाराच्या रूग्णांवर होत असलेल्या उपचाराविषयी माहिती जाणून घेतली. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डेंगू, मलेरिया, टायफाईड, गरोदर व स्तनदा माता, सिकलसेल, बीपी, शुगर व अन्य आजाराच्या रूग्णांवर उपचार होत असल्याची माहिती दिली. या फिरत्या रूग्णालयाद्वारे व्होकार्ड फाऊंडेशनने गडचांदूर सह, कोरपना व घाटंजी तालुक्यातील 32,190 रूग्णांवर यशस्वी औषधोपचार केल्याची माहिती सादर केली.

      या अॅम्बुलॅन्स रूग्णसेवेद्वारा दररोज तीन गावांना भेटी देवून रूग्णांची तपासणी व औषधोपचार केले जात आहे. गेलच्या माध्यमातून झरी जामणी व चंदनखेडा परिसरातील 180 गावांना भेट देवून 21843 रूग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी हंसराज अहीर यांनी अनेक विधायक सुचना करीत या यंत्रणांद्वारे ग्रामिण क्षेत्रातील जास्तीत जास्त रूग्णांशी संपर्क साधून ही सेवा रूग्णाभिमुख व्हावी याकरिता वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे असे सांगितले. या कार्यातील अडचणी बाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. गंभीर स्वरूपाच्या आजारी रूग्णांवर योग्य उपचार करवून घेण्यासाठी प्रयत्न करू असेही अहीर यांनी सांगितले.

      सदर बैठकीस भाजप पदाधिकारी तारेंद्र बोर्डे, शिवाजी सेलोकर, केशवराव गिरमाजी, राजु घरोटे, विनोद शेरकी, निलेश ताजने, राहुल सुर्यवंशी यांचेसह डॉ. निखिल शेळके, डॉ. गोपाल बिश्वास, डॉ. मिश्रा, डॉ. रेहान, एसपीओ आश्रय उधार, फार्मासिस्ट वैभव चौधरी, नेहा बुल्ले, सुरेश मल्लेकलवार, प्रविण चव्हान, मयुरी सावसाकडे, आम्रपल्ली बावणे आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये