गौतम नगरमध्ये ‘रेडिएशनचा स्फोट
तिसऱ्या मोबाईल टॉवरविरोधात शिवसेनेचा एल्गार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरात गौतम नगर (स्नेहल नगर) मध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या मोबाईल टॉवरच्या उभारणीविरोधात शिवसेनेच्या वतीने नगर परिषद भद्रावतीच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना ठाम व आक्रमक निवेदन देण्यात आले.
सदर परिसरात 20 मीटर व 100 मीटर अंतरावर दोन मोबाईल टॉवर आधीच उभारले गेले असून, आता तिसरा टॉवर उभारल्यास परिसरातील नागरिकांवर रेडिएशनचा गंभीर धोका निर्माण होणार आहे. यामुळे 4 ते 5 हृदयरोगी वृद्ध नागरिकांचे आयुष्य धोक्यात येत आहे.
मोबाईल टॉवरमधून होणाऱ्या रेडिएशनमुळे कर्करोग, हृदयविकार, झोपेचे विकार, मानसिक तणाव, लहान मुलांमध्ये बौद्धिक परिणाम, प्रजनन क्षमतेवर घातक परिणाम,
असे आजार वाढीस लागतात, हे शास्त्रशुद्धपणे सिद्ध झाले आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी ही तक्रार शिवसेनेचे शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्याकडे मांडली. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात आणि सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की, जर सदर मोबाईल टॉवरचे काम तात्काळ थांबवण्यात आले नाही, तर जनहितार्थ तीव्र आंदोलन उभं करण्यात येईल.
यावेळी शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, शिवसैनिक सुमित हस्तक, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक दीप गारघाटे, शिवसैनिक राज चव्हाण, सुधीर मत्ते, निखिल उताने, रोशन चोधरी, अरुण मत्ते, शिवाजी तेलंग, बंडू कोरडे, नितीन रामटेके, मनोज गेडाम, लता मत्ते, सुनीता उताने, वैशाली तेलंग, प्रिया तेलंग, नंदा ठमके, संजू ठमके, गंगा ठमके, सरस्वती दानव, प्रगती शिंदे, जोशना फुकट, नंदा कोरडे, उज्वला चिलके, मीना अरोरा, अश्विनी मत्ते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.