ओबीसी कोल एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनची बैठक संपन्न
क्षेत्रीय मुख्यालयाची कार्यकारणी कार्यकारणी गठीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नुकतीच ओबीसी कोल एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनची बैठक वनी क्षेत्राच्या संमेलन कक्षात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. यात मार्गदर्शन व जनजागृती तसेच क्षेत्रीय मुख्यालयाची कार्यकारणी सर्वानुमते गठित करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्षेत्रीय अध्यक्ष संकेत खोकले, सहसचिव जीवन मत्ते व सुनील बिपटे उपस्थित होते .यात ओबीसी आरक्षण, कामगारहीत, पुढील असोसिएशनची वाटचाल आदी अनेक विषयावर संकेत खोकले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी क्षेत्रीय मुख्यालयाच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्ष पदी प्रवीण मुसळे, उपाध्यक्ष भारती भोंगळे, सचिव कचरू तपासे, सहसचिव अमोल डकरे, कोषाध्यक्ष गुणवंत भाकरे, सहकोशाध्यक्ष अनुप मत्ते,मीडिया प्रभारी सोनेराव ताजने तर सदस्य म्हणून नितीन मासरकर,शितल कोरपे, किरण थोरात, भूषण लोडे,प्रीती डंबारे आदींची समावेश असून या नवनियुक्त कार्यकारणीला संकेत खोकले,जीवन मत्ते सुनील बिपटे ,प्रवीण झाडे, गणेश रोडे,राजू कुंडले, रोशन जोगी,आदिसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.
बैठकीच्या यशस्वीतेकरीता वि.डी सूर, कचरू तपासे आदींनी अथक परिश्रम घेतले.