ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंचशील नगर येथे घरफोडी करणाऱ्या दोन आरोपीस भद्रावती पोलिसांनी केली अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        पंधरा दिवसांपूर्वी शहरातील पंचशील नगर येथे घरफोडी करून घरातून रोख रक्कम पळविणाऱ्या बल्लारपूर येथील दोन आरोपींना भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. धनेंद्र संगराज पिपलांगे वय 19 वर्ष व अमन उर्फ टिंगू इंद्रकुमार निषाद व 19 वर्ष दोघेही राहणार बल्लारपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 9250 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

पंचशील नगर येथील पांडुरंग लहानुजी रामटेके हे आपल्या मुलाकडे बाहेरगावी गेले असता सदर चोरट्यांनी घरफोडी करून घरातील रोख रक्कम लांबवली होती. सदर कारवाई ठाणेदार योगेश पारधी यांचे मार्गदर्शनात गजानन तुपकर,महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये