ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रचंड उत्साह आणि जबरदस्त प्रतिसादात पार पडला महाराष्ट्र राज्यशास्त्र अकॅडमी द्वारा निर्मित सराव पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

वरोरा:- हिरालाल लोया कनिष्ठ महा.वरोरा येथे काल दिनांक ,12 जुलै रोजी महाराष्ट्र राज्यशास्त्र अकॅडमी द्वारा निर्मित प्रश्नोत्तर संच आणि सराव पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

भारत शिक्षण संस्थेचे सचिव श्री कृष्णकांत लोया, श्री महेश डोंगरे सर, प्राचार्य हिरालाल लोया कनिष्ठ महा. श्री राहुल राखे सर, प्राचार्य लोकमान्य महाविद्यालय वरोरा, श्री. पवार सर उपप्राचार्य हिरालाल लोया क.महा.वरोरा, सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.शरद जोगी सर, प्रा.रविकांत जोशी सर, प्रा.सौ.स्मिता जयकर, डॉ. गोपाल चव्हाण, डॉ.शिल्पा चौधरी, प्रा.सिद्धार्थ मेश्राम, प्रा.संतोष निखाते, प्रा.गजभिये, चित्रकार अरविंद शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.

 महाराष्ट्र राज्यशास्त्र अकॅडमी द्वारा निर्मित हे सराव पुस्तक राज्यशास्त्र विषयात चांगले गुण प्राप्त करण्यासाठी तर उपयुक्त ठरणार आहेच, परंतु राज्यशास्त्र विषयाचे आणि अभ्यासक्रमातील सर्व महत्वपूर्ण संकल्पनांचे आशय विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, या शब्दात या उपक्रमाचा गौरव कार्यक्रमाचे उद्घाटक श्री कृष्णकांत लोया सर यांनी करून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना हे सराव पुस्तक उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.तसेच आपल्या विद्यालयातील अत्यंत गरीब,आणि होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे 50 पुस्तके स्वतः तर्फे वितरीत केल्या.

   प्रकाशन समारंभानंतर हिरालाल लोया विद्यालय, आणि लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे बहारदार आयोजन पुस्तकाचे लेखक डॉ.पितांबर उरकुडे यांनी करून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि जोश निर्माण केला. प्रश्नमंजुषा कार्यक्रमास उपस्थित जवळपास 300 विद्यार्थ्यांनि प्रचंड प्रतिसाद दिला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजय झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र अकॅडमी तर्फे सराव पुस्तक मोफत भेट देण्यात आली. सराव पुस्तिकेचे अवलोकन केल्यानंतर हिरालाल लोया कनिष्ठ.महा.ची विद्यार्थिनी ku. उज्मा शेख या विद्यार्थिनीने महा.राज्यशास्त्र अकॅडमी तर्फे डॉ.पितांबर उरकुडे सर यांनी काढलेल्या बारावी राज्यशास्त्र विषयाच्या नोट्स आम्हला अतिशय उपयुक्त ठरतात आणि आता हे.प्रश्नसंच आणि सराव पुस्तक त्यापेक्षा अधिक उपयुक्त ठरेल अशा भावना व्यक्त करून अकॅडमी तर्फे अशेच शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांनाकरिता आयोजित करण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

तत्पूर्वी प्रस्तुत सराव पुस्तिकेची किंमत विद्यार्थ्यांकरिता किती असेल यावर उपस्थित विद्यार्थ्यांकडून मत मागवून घेतले असता कुमारी रेणुका या विद्यार्थ्यांनीने प्रस्तुत पुस्तकाची किंमत ही 100 रुपये असेल असे अचूक उत्तर देऊन प्रकाशन समारंभ झाल्यानंतर पहिले सराव पुस्तक मोफत प्राप्त करण्याचा बहुमान प्राप्त केला.पाहुण्याचे हस्ते कुमारी रेणुका हिला पहिले पुस्तक मोफत प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमानंतर महाराष्ट्र राज्यशास्त्र अकॅडमी या सेल्फी स्टँड वर सराव पुस्तेकेसोबत सेल्फी काढण्याचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार वितरीत करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.

 सराव पुस्तिकेचे सहकारी लेखिका डॉ.निवेदिता राऊत यांनी कार्यक्रमाचे अतिशय बहारदार संचलन करून एक नवी रंगत कार्यक्रमात आणली.सराव पुस्तिकेचे मुखपृष्ठ ज्यांनी निर्माण केले ते चित्रकार अरविंद शेलार यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. अरविंद शेलार यांनी सादर केलेल्या कवितेने उपस्थितांचे मन हेलावून गेले होते. सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.शरद जोगी सर, प्रा.रविकांत जोशी सर, प्रा.सौ.स्मिता जयकर मॅडम प्रा.सिद्धार्थ मेश्राम यांचा यावेळी महाराष्ट्र राज्यशास्त्र अकॅडमी तर्फे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना त्यांनी राज्यशास्त्र अकॅडमी च्या उपक्रमाचे भरभरून कौतुक करून भविष्यात राज्यशास्त्र अकॅडमी राज्यशास्त्र विषय अधिक विद्यार्थीप्रिय करण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडेल असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमांच्या शेवटी सराव पुस्तिकेचे सहलेखक डॉ. गोपाल चव्हाण सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये