ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांची दौंड येथे ग्रुप 05 ला समादेशक म्हणून नियुक्ती

दिलीप भुजबळ विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर यांनी दिल्या राहुल चव्हाण यांना हार्दिक शुभेच्छा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अनुराग जैन पोलिस अधीक्षक वर्धा यांनी केले राहुल चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन

 दिनांक 11 जुलै 2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव येथे कार्यरत असलेले राहुल चव्हाण यांची पदोन्नती झालेली असून यांची नियुक्ती दौंड येथे ग्रुप 05 ला समादेशक करण्यात आलीय आहे यावेळी नागपूर येथे कार्यरत असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक दिलीप भुजबळ यांनी राहुल चव्हाण यांची दौंड येथे ग्रुप 05 ला समादेशक नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

तसेच पोलिस अधीक्षक या पदासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आले तसेच वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी सुध्दा राहुल चव्हाण यांचें अभिनंदन करुन पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच पुलगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी व कर्मचारी तसेच उपविभाग पुलगाव येथील उपनिरीक्षक सुधीर बनकर, सफौ महेश देवतळे, दीपक जाधव, संदीप बोरबन यांनी पण चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.

देवळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल मंडाळकर पोलिस उपनिरीक्षक अश्विन गजभिये, शिवराज जाधव, पोलिस अंमलदार मनोज नप्ते, संदिप वाघमारे यांनी राहुल चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढच्या वाटचालीकरीता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये