भद्रावती येथे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस
भद्रावती पोलिसात तक्रार दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील शिवाजीनगर येथे जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जादूटोण्याचे साहित्य जप्त केले व अज्ञात आरोपीविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर येथे मोहम्मद शाहिद अब्दुल रज्जाक हे इसम राहतात.
आज सकाळी त्यांची सून नेहा यांनी दार उघडले असता दरवाजासमोर अंगणात कापलेले लिंबू, त्यावर हळद कुंकू, खिळे, विलायची, रक्षा, लवंग असे पूजेचे साहित्य कोणीतरी अज्ञात इसमाने टाकल्याचे लक्षात आले. त्यांनी सदर प्रकाराची तक्रार भद्रावती पोलिसात केल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्व साहित्य जप्त केले व अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.